आमचे विकास कामे आणि कार्यक्रम
गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी आयोजित विविध कार्यक्रम आणि उपक्रम
आमचे कार्यक्रम / विकास कामे म्हणजे गावाला सक्षम, स्वयंपूर्ण आणि आधुनिक बनवण्याचा एक प्रयत्न आहे
संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये सहभाग घेऊन बोरफडी गावात संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश गाव स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवणे तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जबाबदारीची भावना निर्माण करणे हा होता.
वनराई बंधारे उभारणी – लोकसहभागातून
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बोरफडी गावामध्ये लोकसहभागातून वनराई बंधारे यशस्वीपणे उभारण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे तसेच उन्हाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय उपलब्ध करून देणे हा होता.
मोफत महिला उद्योजकता व कौशल्य प्रशिक्षण शिबीर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत बोरफडी यांच्या वतीने मोफत महिला उद्योजकता व कौशल्य प्रशिक्षण शिबीर यशस्वीपणे आयोजित करण्यात आले. या शिबिराचा मुख्य उद्देश गावातील महिलांना स्वावलंबी बनवणे, त्यांच्यामध्ये उद्योजकतेची भावना निर्माण करणे व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे हा होता.
विविध वस्त्यांवर बोअर वेल व्यवस्था
वस्त्यांमध्ये बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा.
101 शेतकऱ्यांना गायगोठा योजना
101 शेतकऱ्यांना गायगोठ्यांचा लाभ
वृक्ष लागवड
पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक वृक्ष लागवड.
12 ठिकाणी सिमेंट रस्त्यांची निर्मिती
पाऊलवाटांऐवजी मजबूत रस्ते.
ग्रामपंचायत भवनचे भूमिपूजन
ग्रामपंचायतसाठी सुसज्ज व स्वतंत्र इमारत उभारण्याच्या कामाचा शुभारंभ.
अपंगांना दिव्यांग निधी वाटप
दिव्यांग नागरिकांना आर्थिक सहाय्याचे वाटप.
24 शेतकऱ्यांना मनरेगा अंतर्गत विहीर योजना
पाणी समस्या कायमस्वरूपी सोडवली.
गाव – प्लास्टिक बंदी जनजागृती कार्यक्रम
हा उपक्रम बोरफडी गावासाठी स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी भविष्याकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.
185 ग्रामस्थांना हक्काचे पक्के घर – घरकुल योजना
दुर्गम भागातील गरजू, वंचित व उपेक्षित कुटुंबांना सुरक्षित आणि कायमस्वरूपी निवारा.
जी. के. एंटरप्रायजेस – युवकांना रोजगार
स्थानिक युवकांना रोजगार देत स्वावलंबनाची दिशा.
पोखरा योजनेची कार्यशाळा
पोखरा योजनेबाबत शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा.
सरपंच पदाच्या 8 दिवसांत वीज कामास मंजुरी
जलद निर्णयक्षमता आणि प्रभावी पाठपुरावा.
बंधारे बांधकाम
पाणी साठवणुकीसाठी बंधाऱ्याचे बांधकाम.
मोहनगिरवाडी चौक सुशोभीकरण
मोहनगिरवाडी चौकाची शोभा वाढली.
कार्यक्रम श्रेण्या
आमच्या विविध कार्यक्रमांमध्ये सामील होऊन गावाच्या विकासात योगदान द्या
शिक्षण कार्यक्रम
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित शैक्षणिक कार्यक्रम आणि स्पर्धा
- • गुणवंत विद्यार्थी सत्कार
- • शैक्षणिक शिबिरे
- • स्पर्धा आणि परीक्षा
आरोग्य कार्यक्रम
गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आयोजित विविध आरोग्य सेवा आणि शिबिरे
- • विनामूल्य आरोग्य शिबिर
- • रक्तदान शिबिर
- • आरोग्य जागृती कार्यक्रम
स्वच्छता कार्यक्रम
गावाच्या स्वच्छतेसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित विविध उपक्रम
- • स्वच्छ भारत अभियान
- • कचरा व्यवस्थापन
- • पर्यावरण जागृती
कार्यक्रमांचा प्रभाव
आमच्या कार्यक्रमांनी गावातील नागरिकांच्या जीवनावर कसा सकारात्मक परिणाम झाला आहे
सामाजिक एकता
गावातील विविध घटकांमध्ये एकता आणि सहकार्य वाढवले
शैक्षणिक प्रगती
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा
आरोग्य सुधारणा
नागरिकांच्या आरोग्य स्थितीत सुधारणा आणि जागृती
पर्यावरण जागरूकता
स्वच्छ आणि हरित गावासाठी नागरिकांची जागरूकता वाढवली