आमच्याबद्दल
शाश्वत विकासाच्या दिशेने, गावातील प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून
सप्रेम नमस्कार,
मी, कैलास नागनाथ घुगे
सरपंच – आदर्श गाव बोरफडी
ता. जि. बीड
20 डिसेंबर 2022 मध्ये गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि बालाघाटाच्या डोंगररांगेतील अतिशय दुर्गम भागात असलेल्या बोरफडी गावाचा इतिहासातील पहिला सर्वात तरुण सरपंच होण्याचा मान मला मिळाला.
खरेतर राजकारणात मी नवखा होतो. परंतु हिमालयाची उंची थिटे करणारे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि साहेबांइतकीच ताकद व कणखरपणा असलेल्या ना. पंकजाताई मुंडे, तसेच मा. खा. प्रीतमताई मुंडे यांचे विकासाचे राजकारण डोळ्यांसमोर ठेवून काम करण्याचा निर्धार केला.
बोरफडी गावाचा सरपंच म्हणून मला अवघी दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत पहिल्याच दिवसापासून गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे.
माझ्या मते विकास म्हणजे केवळ नाल्या, रस्ते किंवा इमारती नाहीत, तर —
- वाड्या-वस्त्यांमध्ये राहणारे शेतकरी
- डोंगर-दर्यातील कष्टकरी कुटुंबे
- वंचित-उपेक्षित घटक
- महिला, मुली, बालके व वृद्ध
बोरफडी–मोहनगीरवाडी ही ग्रुप ग्रामपंचायत असून गावाचा शिवार अतिशय मोठा आहे. त्यापैकी सुमारे 90 टक्के शेती डोंगर व माळरानावर आहे.
या काळात ना. पंकजाताई मुंडे कोणत्याही सत्तेत किंवा पदावर नव्हत्या. त्यामुळे निधी मिळवणे अत्यंत कठीण होते. परंतु “लोकल टू ग्लोबल” हे त्यांचे विकासस्वप्न डोळ्यांसमोर ठेवून मी कधीही मागे वळून पाहिले नाही.
👉 अभिमानाने सांगतो, ना. पंकजाताई साहेब व मा. खा. प्रीतमताई यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्याने अवघ्या 20–22 महिन्यांत ₹15 कोटी 27 लाख 33 हजार इतका विकासनिधी बोरफडी गावासाठी आणण्यात यश मिळाले.
डिसेंबर 2022 पूर्वी बोरफडी शिवारातील 13 वस्त्यांपैकी एकाही वस्तीला रस्ता किंवा वीज नव्हती. पाऊलवाटेनेच ये-जा करावी लागत होती व आजारी रुग्णांना झोळीतून गावात आणावे लागे.
अवघ्या दोन वर्षांत 13 वस्त्यांपर्यंत वीज व रस्ते, 12 सिमेंट रस्ते, 34 खडीकरण रस्ते, 101 गायगोठे, 24 विहिरी, 185 घरकुले, जलजीवन मिशन, RO पाणी प्रकल्प, बंधारे व भव्य प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारून गावाचा विकासातून कायापालट करण्यात आला आहे.
गावातील मंदिर
जिल्हा परिषद शाळा
गोपीनाथरावजी मुंडे साहेब चौक.
प्राथमिक आरोग्य केंद्र
आमचे ध्येय आणि ध्येयवाद
दृष्टी
Vision
ला एक आदर्श ग्राम म्हणून विकसित करणे जिथे प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावले जाईल, शैक्षणिक, आरोग्य आणि आर्थिक विकास साधला जाईल आणि गावाची परंपरा आणि संस्कृती जपली जाईल.
उद्देश
Mission
पारदर्शक आणि नागरिक केंद्रित प्रशासन राबवणे, डिजिटल सेवांचा प्रभावी वापर करून नागरिकांच्या जीवनात सुलभता आणणे आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणे.
आमचे मूल्ये
आमच्या कार्याचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक तत्त्वे
पारदर्शकता
सर्व निर्णय आणि कार्यवाही पारदर्शक आणि जबाबदार
नागरिक केंद्रित
नागरिकांच्या गरजा आणि हितसंबंध प्रथम
नावीन्य
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नावीन्यपूर्ण उपाय
सेवाभाव
नागरिक सेवेसाठी समर्पित आणि कटिबद्ध
आमची कामगिरी
गेल्या वर्षात आम्ही साध्य केलेले महत्त्वाचे उद्दिष्टे आणि उपलब्धी
100% डिजिटल सेवांचे
सर्व नागरिकांना ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिल्या
95% शिक्षण दर
गावातील मुलांची शिक्षणाची गुणवत्ता सुधारली
स्वच्छ गाव पुरस्कार
राज्यस्तरीय स्वच्छता स्पर्धेत प्रथम क्रमांक
संपर्क करा
आमच्याशी थेट संपर्क साधा
ग्रामस्थांच्या समस्या, सूचना व विकासकामांबाबत संवादासाठी खालील संपर्क माहिती उपलब्ध आहे.
पत्ता
ग्रामपंचायत कार्यालय, बोरफडी – मोहनगिरवाडी, ता. जि. बीड, महाराष्ट्र
दूरध्वनी
+91 90499 62926
ईमेल
kailashghuge@gmail.com
कार्यालयीन वेळ
सोमवार ते शनिवार : सकाळी 10:00 ते सायं. 5:00
आमचे स्थान
ग्रामपंचायत कार्यालय, बोरफडी – मोहनगिरवाडी
संदेश पाठवा
आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवा आणि आमच्या सेवांचा लाभ घ्या