विकासातून बदल घडवणारा नेतृत्वाचा चेहरा

कैलास नागनाथ घुगे

सरपंच – आदर्श गाव बोरफडी, ता. जि. बीड. दुर्गम डोंगराळ भागात अवघ्या दोन वर्षांत ₹15.27 कोटींचा विकासनिधी, 13 वस्त्यांपर्यंत रस्ते, वीज, पाणी आणि घरकुल पोहोचवणारे तरुण नेतृत्व. लोकसेवेची बांधिलकी, दर्जेदार काम आणि पारदर्शक कारभार यातून घडलेले बोरफडी गावाचे विकासाचे नवे पर्व.

₹15.27 कोटी+
विकासनिधी
185+
घरकुले
विकासकामे पाहा
महत्वाचे मोफत महिला उद्योजकता व कौशल्य प्रशिक्षण शिबीर 📅 ३० डिसेंबर २०२५
महत्वाचे ग्रामपंचायतीच्या निवासी मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सूट. 📅 १८ डिसेंबर २०२५
महत्वाचे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 📅 १२ डिसेंबर २०२५
महत्वाचे ग्रामपंचायत प्रमाणपत्रे आता ऑनलाईन उपलब्ध 📅 १५ जानेवारी २०२५
महत्वाचे मोफत महिला उद्योजकता व कौशल्य प्रशिक्षण शिबीर 📅 ३० डिसेंबर २०२५
महत्वाचे ग्रामपंचायतीच्या निवासी मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सूट. 📅 १८ डिसेंबर २०२५
महत्वाचे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 📅 १२ डिसेंबर २०२५
महत्वाचे ग्रामपंचायत प्रमाणपत्रे आता ऑनलाईन उपलब्ध 📅 १५ जानेवारी २०२५
प्रस्तावना

सप्रेम नमस्कार,

मी, कैलास नागनाथ घुगे
सरपंच – आदर्श गाव बोरफडी
ता. जि. बीड
20 डिसेंबर 2022 मध्ये गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि बालाघाटाच्या डोंगररांगेतील अतिशय दुर्गम भागात असलेल्या बोरफडी गावाचा इतिहासातील पहिला सर्वात तरुण सरपंच होण्याचा मान मला मिळाला.
खरेतर राजकारणात मी नवखा होतो. परंतु हिमालयाची उंची थिटे करणारे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि साहेबांइतकीच ताकद व कणखरपणा असलेल्या ना. पंकजाताई मुंडे, तसेच मा. खा. प्रीतमताई मुंडे यांचे विकासाचे राजकारण डोळ्यांसमोर ठेवून काम करण्याचा निर्धार केला.

बोरफडी गावाचा सरपंच म्हणून मला अवघी दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत पहिल्याच दिवसापासून गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे.
माझ्या मते विकास म्हणजे केवळ नाल्या, रस्ते किंवा इमारती नाहीत, तर —

  • वाड्या-वस्त्यांमध्ये राहणारे शेतकरी
  • डोंगर-दर्‍यातील कष्टकरी कुटुंबे
  • वंचित-उपेक्षित घटक
  • महिला, मुली, बालके व वृद्ध
यांचे मूलभूत प्रश्न प्राधान्याने सोडवणे, हाच खरा विकास आहे.
बोरफडी–मोहनगीरवाडी ही ग्रुप ग्रामपंचायत असून गावाचा शिवार अतिशय मोठा आहे. त्यापैकी सुमारे 90 टक्के शेती डोंगर व माळरानावर आहे.

या काळात ना. पंकजाताई मुंडे कोणत्याही सत्तेत किंवा पदावर नव्हत्या. त्यामुळे निधी मिळवणे अत्यंत कठीण होते. परंतु “लोकल टू ग्लोबल” हे त्यांचे विकासस्वप्न डोळ्यांसमोर ठेवून मी कधीही मागे वळून पाहिले नाही.
👉 अभिमानाने सांगतो, ना. पंकजाताई साहेब व मा. खा. प्रीतमताई यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्याने अवघ्या 20–22 महिन्यांत ₹15 कोटी 27 लाख 33 हजार इतका विकासनिधी बोरफडी गावासाठी आणण्यात यश मिळाले.
डिसेंबर 2022 पूर्वी बोरफडी शिवारातील 13 वस्त्यांपैकी एकाही वस्तीला रस्ता किंवा वीज नव्हती. पाऊलवाटेनेच ये-जा करावी लागत होती व आजारी रुग्णांना झोळीतून गावात आणावे लागे.
अवघ्या दोन वर्षांत 13 वस्त्यांपर्यंत वीज व रस्ते, 12 सिमेंट रस्ते, 34 खडीकरण रस्ते, 101 गायगोठे, 24 विहिरी, 185 घरकुले, जलजीवन मिशन, RO पाणी प्रकल्प, बंधारे व भव्य प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारून गावाचा विकासातून कायापालट करण्यात आला आहे.

गावातील मंदिर

गावातील मंदिर

जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद शाळा

गोपीनाथरावजी मुंडे साहेब चौक.

गोपीनाथरावजी मुंडे साहेब चौक.

प्राथमिक आरोग्य केंद्र

प्राथमिक आरोग्य केंद्र

आमचे प्रशासकीय अधिकारी

श्रीमती यमुना बाबासाहेब कुटे
श्रीमती यमुना बाबासाहेब कुटे

उपसरपंच

संपर्क माहिती

विभाग: ग्रामपंचायत

9850525186

कार्ड वळवण्यासाठी क्लिक करा
श्री. कैलास नागनाथ घुगे
श्री. कैलास नागनाथ घुगे

सरपंच

संपर्क माहिती

विभाग: ग्रामपंचायत

9049962926

kailashghuge@gmail.com

कार्ड वळवण्यासाठी क्लिक करा
श्री. विवेक विठ्ठल गित्ते
श्री. विवेक विठ्ठल गित्ते

ग्रामपंचायत अधिकारी

संपर्क माहिती

विभाग:

9338947777

कार्ड वळवण्यासाठी क्लिक करा

ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी मंडळ

श्रीमती. लताबाई चिंतामण वाघमारे
श्रीमती. लताबाई चिंतामण वाघमारे

सदस्य

संपर्क माहिती

वॉर्ड क्रमांक 1

7507059068

गोरख सुग्रीव घुगे
गोरख सुग्रीव घुगे

सदस्य

संपर्क माहिती

वॉर्ड क्रमांक 1

9763643977

श्रीमती. लक्ष्मी लिंबाजी कुटे
श्रीमती. लक्ष्मी लिंबाजी कुटे

सदस्य

संपर्क माहिती

वॉर्ड क्रमांक 2

9049523599

श्री. गोपिनाथ भिमराव धुगे
श्री. गोपिनाथ भिमराव धुगे

सदस्य

संपर्क माहिती

वॉर्ड क्रमांक 2

9923337312

श्री. ज्योतीराम बापूराव पन्हाळे
श्री. ज्योतीराम बापूराव पन्हाळे

सदस्य

संपर्क माहिती

वॉर्ड क्रमांक 3

9856566464

श्रीमती. नंदा नवनाथ कुटे
श्रीमती. नंदा नवनाथ कुटे

सदस्य

संपर्क माहिती

वॉर्ड क्रमांक 3

9552507555

श्री. बाबासाहेब बाबू कुटे
श्री. बाबासाहेब बाबू कुटे

पाणीपुरवठा कर्मचारी

संपर्क माहिती

पाणीपुरवठा कर्मचारी

9049537735

श्री. तेजस बाबासाहेब कानाडे
श्री. तेजस बाबासाहेब कानाडे

शिपाई

संपर्क माहिती

शिपाई

8329394535

श्री. विक्रम दगडूराम कुटे
श्री. विक्रम दगडूराम कुटे

ग्रामरोजगार सेवक

संपर्क माहिती

ग्रामरोजगार सेवक

9673974948

गाव माहिती व आकडेवारी

आमच्या गावाची महत्वपूर्ण माहिती आणि विकासाचे आकडे

ग्रामपंचायत

बोरफडी

तालुका

बीड

जिल्हा

बीड

राज्य

महाराष्ट्र

३,६३३

एकूण लोकसंख्या

३५५

एकूण कुटुंबे

१,७८२

मतदार संख्या

८०.००%

साक्षरता दर

१९६२

स्थापना वर्ष

० हेक्टर

क्षेत्रफळ

शाळा

अंगणवाडी

आरोग्य केंद्र

धार्मिक स्थळे

१००

पाणी स्रोत

१५

स्ट्रीट लाईट

महिला बचत गट

शेतकरी गट

कार्यालय वेळ

ग्रामसभेची बैठक दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित केली जाते

सुविधा

  • माहिती उपलब्ध नाही

ग्रामपंचायतीच्या सूचना

नवीनतम सूचना, जाहिराती आणि महत्वाच्या घोषणा

मोफत महिला उद्योजकता व कौशल्य प्रशिक्षण शिबीर
३० डिसेंबर २०२५
important

मोफत महिला उद्योजकता व कौशल्य प्रशिक्षण शिबीर

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत बोरफडी यांच्या वतीने मोफत महिला उद्योजकता व कौशल्य प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येत आहे. 📌 कार्यक्रमाचा तपशील : दिनांक : मंगळवार, दि. 30 डिसेंबर 2025 वेळ : सकाळी 10.00 वाजता स्थळ : ग्रामपंचायत कार्यालय, बोरफडी 👩‍🏫 मार्गदर्शन : उमेद अमृता मेक ओव्हर & स्कील डेव्हलपमेंट 👥 प्रमुख उपस्थिती : सर्व गावकरी महिला मंडळ

दिनांक: ३० डिसेंबर २०२५
ग्रामपंचायतीच्या  निवासी मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी  मोठी सूट.
१८ डिसेंबर २०२५
महत्वाचे

ग्रामपंचायतीच्या निवासी मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सूट.

दिनांक 13 नोव्हेंबर 2025 च्या शासन निर्णय नुसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मध्ये मोठी कर सवलत जाहीर.

दिनांक: १८ डिसेंबर २०२५
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
१२ डिसेंबर २०२५
important

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत विविध विकासात्मक उपक्रम, लोककल्याणकारी योजना, प्रशिक्षण शिबिरे, जनजागृती कार्यक्रम व सेवा सुविधा राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या समस्या सोडविणे, महिला सक्षमीकरण, रोजगार व कौशल्य विकास तसेच शासनाच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा आहे. तरी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांनी: ग्रामपंचायतीद्वारे आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहावे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा ग्रामपंचायतीच्या विकास कार्यात सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधावा.

दिनांक: १२ डिसेंबर २०२५

आमचे कार्यक्रम / विकास कामे म्हणजे गावाला सक्षम, स्वयंपूर्ण आणि आधुनिक बनवण्याचा एक प्रयत्न आहे

संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम
संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम
संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम
संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम
संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम
ग्राम स्वच्छता

संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम

३० डिसेंबर २०२५

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये सहभाग घेऊन बोरफडी गावात संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश गाव स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवणे तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जबाबदारीची भावना निर्माण करणे हा होता.

वनराई बंधारे उभारणी – लोकसहभागातून
वनराई बंधारे उभारणी – लोकसहभागातून
वनराई बंधारे उभारणी – लोकसहभागातून
वनराई बंधारे उभारणी – लोकसहभागातून
वनराई बंधारे

वनराई बंधारे उभारणी – लोकसहभागातून

३० डिसेंबर २०२५

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बोरफडी गावामध्ये लोकसहभागातून वनराई बंधारे यशस्वीपणे उभारण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे तसेच उन्हाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय उपलब्ध करून देणे हा होता.

मोफत महिला उद्योजकता व कौशल्य प्रशिक्षण शिबीर
मोफत महिला उद्योजकता व कौशल्य प्रशिक्षण शिबीर
मोफत महिला उद्योजकता व कौशल्य प्रशिक्षण शिबीर
मोफत महिला उद्योजकता व कौशल्य प्रशिक्षण शिबीर
कौशल्य प्रशिक्षण

मोफत महिला उद्योजकता व कौशल्य प्रशिक्षण शिबीर

३० डिसेंबर २०२५

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत बोरफडी यांच्या वतीने मोफत महिला उद्योजकता व कौशल्य प्रशिक्षण शिबीर यशस्वीपणे आयोजित करण्यात आले. या शिबिराचा मुख्य उद्देश गावातील महिलांना स्वावलंबी बनवणे, त्यांच्यामध्ये उद्योजकतेची भावना निर्माण करणे व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे हा होता.

संपर्क करा

आमच्याशी थेट संपर्क साधा

ग्रामस्थांच्या समस्या, सूचना व विकासकामांबाबत संवादासाठी खालील संपर्क माहिती उपलब्ध आहे.

पत्ता

ग्रामपंचायत कार्यालय, बोरफडी – मोहनगिरवाडी, ता. जि. बीड, महाराष्ट्र

दूरध्वनी

+91 90499 62926

ईमेल

kailashghuge@gmail.com

कार्यालयीन वेळ

सोमवार ते शनिवार : सकाळी 10:00 ते सायं. 5:00

आमचे स्थान

ग्रामपंचायत कार्यालय, बोरफडी – मोहनगिरवाडी

संदेश पाठवा

आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवा आणि आमच्या सेवांचा लाभ घ्या